Pavan Khindit Pavan Jhalon

दशरथ पुजारी

पावनखिंडीत पावन झालो जिंकलीच बाजी बाजी जातो देवाघरती मरणाला राजी पावनखिंडीत पावन झालो विशालगड्च्या तोफेसाठी कान जिवाचे केले लाल लाल जरी मान लटकली बोथट झाले भाले रक्ताच्या थेंबांतुन उठतिल लाख लाख बाजी बाजी जातो देवाघरती मरणाला राजी पावनखिंडीत पावन झालो मान आणखी इमान अमुचे शिवबाच्या चरणी स्वर्ग लाभतों धारातीर्थी लय लागे मरणी कसूर शिवबा केली नाही नसावित राजी बाजी जातो देवाघरती मरणाला राजी पावनखिंडीत पावन झालो तोफ उडाली हास्य लाल ते मुखावरी फुलले सुटले राजे सुटलो मीही कलेवरही हसले भाग्याशील हे मरण आमुचे मला मिळे आजी बाजी जातो देवाघरती मरणाला राजी पावनखिंडीत पावन झालो

Written by: DASHRATH PUJARI, VASANT DESHMUKHLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs