Preet Hi Dolyant Majhya

दशरथ पुजारी, सुमन कल्याणपुर

प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी मी तुझ्या हृदयात आहे तू असावे अंतरी प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी भावना दाटून आल्या दाटुनी संवेदना कल्पनांनी जाणुनी घे अंतरीच्या या खुणा काय बोलावे सुचेना मूक झाली वैखरी प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी भरुन आली का तुझी ती पावसाळी लोचने का तुझ्या अश्रूंत भिजले केशरी ते चांदणे सोड वेडे हा अबोला वेल का तू लाजरी प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी मी फुलावे मी हसावे सांगते माझ्या मना चंदनाच्या चांदण्यांनी गंध येतो जीवना सप्तरंगी जीवनाचे गंध उधळू अंबरी मी तुझ्या हृदयात आहे तू असावे अंतरी प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी

Written by: DASHARATH PUJARI, MADHUKAR JOSHILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs