Saanjveli Jaat Hote Ghari
उषा मंगेशकर
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी
अडवून वाट माझी उभा राहे हरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
मनात मी बावरले
मनात मी बावरले कशी-बशी सावरले
मनात मी बावरले कशी-बशी सावरले
अचानक तोच हाय
अचानक तोच हाय कोसळल्या सरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
आभाळात ओले रंग चिंब-चिंब माझे अंग
आभाळात ओले रंग चिंब-चिंब माझे अंग
काय उपयोग आता
काय उपयोग आता सावरून तरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पडे अनोळखी भूल
पडे अनोळखी भूल फुलले मी जसे फूल
बासरीचे सूर माझ्या
बासरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
काही बोलले मी नाही
काही बोलले मी नाही वितळल्या दिशा दाही
वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस
चांदण्याचा राजहंस धरिला मी उरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
Written by: MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now