Ha Unaad Avakhal Vaara
उषा मंगेशकर
हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा
हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा
हे कुंतल काळे मेघ डोळ्यांत नाचते वीज
अंगावर फुलुनी आली ही यौवनातली लाज
ही यौवनातली लाज
चालीतून माझ्या भरला हरिणीचा नाजूक नखरा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा
हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी
हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी
सुमगंध सोडुनी भुंगे लागलेत माझ्या नादी
लागलेत माझ्या नादी
बांधिते अशी पदराशी गंधीत फुलांच्या नजरा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा
बहराच्या हिरव्या रानी परदेशी आला रावा
भुलवून जिवाला बाई तो नेई दूरच्या गावा
तो नेई दूरच्या गावा
मधुबोल तयाचे रुजवी अंगावरी गोड शहारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा
हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now