Vihinbai Vihinbai

सुषमा श्रेष्ठ

विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा विहीणबाई उठा भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा विहीणबाई उठा पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा विहीणबाई उठा कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा आता उठा आता उठा विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा विहीणबाई उठा सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकार्‍यांशी नातं जोडुन बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा विहीणबाई उठा

Written by: Shanta Shelke, Srinivas KhaleLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs