Ya Bakulichya Zadakhali

सुषमा श्रेष्ठ

या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले या बकुळीच्या झाडाखाली इथेच माझ्या स्वप्नांसाठी एक रेशमी झुला झुले झुला झुले या बकुळीच्या झाडाखाली इथेच माझी बाळ पाऊले दंवात भिजली बालपणी इथेच माझी बाळ पाऊले दंवात भिजली बालपणी दूर देशीच्या युवराजाने इथेच मजला फूल दिले फूल दिले या बकुळीच्या झाडाखाली तिने आसवें पुसली माझी हृदयामधला गंध दिला चांदण्यातले सोन कवडसे माझ्यासाठी अंथरले अंथरले या बकुळीच्या झाडाखाली बकुळी माझी सखी जिवाची जन्मांतरीचे प्रेम जुने तिला पाहता खुलते मी अन् मला पाहता तीही खुले तीही खुले या बकुळीच्या झाडाखाली

Written by: BHANUKANT LUKTUKE, VASANT BAPATLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs