Vitthalachya Payi Veet

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी अनाथांचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राहे पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहुनिया विटेवरती विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs