Nakat Vakada
जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर
नाकात वाकडा नथीचा आकडा
वई वई वई नाकात वाकडा नथीचा आकडा
मोत्यांचं कुलूप ओठांच्या कवाडा ग ग ग
बंदोबस्त का ग केला एवढा
वई वई वई बंदोबस्त का ग केला एवढा
बोलांचं माणिक हसण्याचं हिरं
बोलांचं माणिक हसण्याचं हिरं
रत्नांनी भरला रूपाचा वाडा
तुझ्यावाणी वेडा घालील दरोडा
बंदोबस्त केला म्हणुन एवढा
अग बाई बाई बाई बंदोबस्त केला म्हणुन एवढा
येऊन गुपचूप
येऊन गुपचूप तोडीन कुलूप
तोडीन कुलूप
अरं भलतेच नको रं बोलू उनाडा बोलू उनाडा
अरं बोलू उनाडा बोलू उनाडा
अग गप
अग बाई बाई बाई बाई
नाकात वाकडा नथीचा आकडा
वई वई वई नाकात वाकडा नथीचा आकडा
मोत्यांचं कुलूप ओठांच्या कवाडा
बंदोबस्त केला म्हणुन एवढा
अग घालिन दरोडा धुंडीन वाडा
अरं पायांत पडंल रं जन्माचा खोडा
हे घालिन दरोडा धुंडीन वाडा
अरं पायांत पडंल रं जन्माचा खोडा
सोशीन खोडा हवा तेवढा
आधीच कशाला तंटाबखेडा
आधीच कशाला तंटाबखेडा
तुझा माझा जोडा पायी घाल खोडा
तुझा माझा जोडा पायी घाल खोडा
Written by: G D Madgulkar, Kadam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now