Labaad Landaga Dhong Karatay

जयवंत कुलकर्णी

असच व्हतं एक जंगाल जंगाल हम्म त्या जंगलात झालं मंगाल मंगाल हम्म वाघ आलं सिंव्ह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंव्ह आलं हत्ती आलं घोडं आलं उट आलं माकड आलं खोकड आलं बोकड आलं अबबबब लबाड लांडग ढाँग करतय लबाड लांडग ढाँग करतय लगीन करायच सॉंग करतय ढाँग करतय लबाड लांडग ढाँग करतय लांडगा नवरा नी शेळी नवरी डोईवर बाशिंग ठरना डोईवर बाशिंग ठरना आणि नवरीला लुगडं पुरना ये हे हे ये हे हे ये हे हे सासूचा शालू सासऱ्याचा पटका सासूचा शालू सासऱ्याचा पटका ठिगाळ जोडून लांब करतंय ढाँग करतय लबाड लांडग ढाँग करतय तांदूळ वाटतोय ससा करवली हरनी म्हणती बसा जी हरनी म्हणती बसा नी ढोबळ अस्वाल म्हणतंय हसा जी ये हे हे ये हे हे ये हे हे वाघाचा ताशा सिंव्हाचं ढोलकं वाघाचा ताशा सिंव्हाचं ढोलकं पिपाणी संग ढाम करतंय कस ढाँग करतय लबाड लांडग ढाँग करतय घटका भरली तिथं तरी बी भटजी मिळना कुठं हो भटजी मिळना कुठं आगावू गाढवं ताड्कन उठ हो टिपत गातं मंतार म्हणतं टिपत गातं मंतार म्हणतं भोकाडं पसरून व्हॉव करतंय ढाँग करतय लबाड लांडग ढाँग करतय मांडाव झाला वसाड सारा पळत सुटलं व्हराड हा हा हा पळत सुटलं व्हराड लांडगा शेळीचा करतोय फराळ माणूस काय बोला बोला अन्‌ गाढाव काय माणूस काय अन्‌ गाढाव काय जाईल तकडं भोंग करतय कस ढाँग करतय

Written by: Jagdish Khebudkar, Kadam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs