Jashil Kuthe Muli Too
रवींद्र, Asha Bhosale
जाशिल कोठे मुली तू
नेशिल तेथ मुला तू
जाशिल कोठे मुली तू
नेशिल तेथ मुला तू
नेऊ कुठे मी तुला सुंदरी
स्वप्नात ने यक्षभूमीवरी
नेऊ कुठे मी तुला सुंदरी
स्वप्नात ने यक्षभूमीवरी
स्वप्न कोठे वसे त्यात जावे कसे
हात हाती धरी संगती चाल तू
जाशिल कोठे मुली तू
नेशिल तेथ मुला तू
प्रीतिचा प्रांत का अजून ना लागला
भृंग गाति पहा चुंबताना फुला
वृक्ष आणि लता डोलती बिलगता
वृक्ष आणि लता डोलती बिलगता
पाहुनि घे गडे प्रीतिची रीत तू
जाशिल कोठे मुली तू
नेशिल तेथ मुला तू
आनंद लाभे मना लोचना
प्रीतीमुळे ही फुले भावना
ती कथा राहिली प्रीत ना पाहिली
ती कथा राहिली प्रीत ना पाहिली
पांघरू पाहसी व्यर्थ का वेड तू
जाशिल कोठे मुली तू
नेशिल तेथ मुला तू
Written by: G D Madgulkar, Sudhir Phadke, SUDHIR V PHADKELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now