Are Khopymandhi Khop
उत्तरा केळकर
बहिणाबाई जवळ निरीक्षणासाठी लागणारी दूर दृष्टी होती
त्या मुळे निसर्गाच्या साध्या गोष्टी मध्ये ही
काही महत्वाचा आशय भरलाय हे तिच्या लक्षात येत असे
सुगरणीच झाडावर टांगलेल घरट आपण पाहतो
किती मुलायम असत ते आणि तरही कस घट्ट आणि मजबूत
ईवलीशी चोच आणि पायातील बोटं
पण तेवढ्या वर सुगरण अचंबा वाटावा अशी कारागिरी करते
माणसा जवळ तर चांगले दोन हात आणि दहा बोटं आहेत
मग त्याने काय आणि किती करायला हवं
वार्याने झुळणार्या खोप्या कडे पाहून
बहिणाबाईच्या तरल प्रतिभेचा झोकाही आकाशात उंच उंच जातो.
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला
पिल्लं निजली खोप्यात जसा झुलता बंगला
पिल्लं निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुले दिले रे देवानं दोन हात दहा बोटं
तुले दिले रे देवानं दोन हात दहा बोटं
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला
झोका झाडाले टांगला
झोका झाडाले टांगला
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now