Limblon Utaru Kashi

सुमन कल्याणपुर

लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका सर्व भार घेतला असा समर्थ खांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू धन्य कूस आइची धन्य कान लोचने कृतार्थ जन्म जाहला फिटून जाय पारणे अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू शीणभाग संपला तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs