Palavili Ravane Seeta
सुधीर फडके
या फुलांची ओळख पटल्यामुळं
छात्रप्रति उसंबळून आलेले श्री राम
सीता शोधार्थ पुढे निघाले
वाटेमध्ये त्यांना एक पक्षीश्रेष्ठ
रक्तानं माखल्या अवस्थेमध्ये
भूमीवर पडलेला दिसला
या विद्रुपधारी राक्षसानंच
सीता भक्षण केली असली पाहिजे
अशा कल्पनेनं श्री रामाने क्षुरसौम्यक बाण
त्याच्यावर रोखला तेव्हा फेसासह रक्त ओकीत असलेला
तो पक्षीराज जटायू श्री रामांना म्हणाला
मरणोन्मुख त्याला कां रे मारिसी पुन्हां रघुनाथा
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
पाहिली जधीं मी जातां
रामाविण राज्ञी सीता
देवरही संगे नव्हता
मी बळें उडालों रामा मी बळें उडालों रामा
रोधिलें रथाच्या पंथा
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
तो नृशंस रावण कामी
नेतसे तिला कां धामीं
तो नृशंस रावण कामी
नेतसे तिला कां धामीं
जाणिलें मनीं सारें मी
चावलों तयाच्या हातां चावलों तयाच्या हातां
हाणिले पंख हे माथां
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
रक्षिण्या रामराज्ञीसी
झुंजलों घोर मी त्यासी
रक्षिण्या रामराज्ञीसी
झुंजलों घोर मी त्यासी
तोडिलें कवचमुकुटासी
लावूं नच दिधलें बाणां स्पर्शू ना दिधला भाता
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
सर्वांगा दिधले डंख
वज्रासम मारित पंख
सर्वांगा दिधले डंख
वज्रासम मारित पंख
खेळलो द्वंद्व निःशंक
पाडला सारथी खाली खाइ तो खरांच्या लाथा
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
सारुन दूर देवीस
मोडिला रथाचा आंस
भंगिलें उभय चक्रांस
ठेंचाळुन गर्दभ पडलें दुसऱ्याच्या थटुनी प्रेता
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
लोळलें छत्रही खालीं
युद्धाची सीमा झाली
लोळलें छत्रही खालीं
युद्धाची सीमा झाली
मी शर्थ राघवा केली
मी शर्थ राघवा केली
धांवला उगारुन खड्गा पौलस्ती चावित दातां
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
हे पंख छेदिल्यावरती
मी पडलो धरणीवरती
हे पंख छेदिल्यावरती
मी पडलो धरणीवरती
ती थरथर कांपे युवती
ती थरथर कांपे युवती
तडफडाट माझा झाला तिज कवेंत त्यानें घेतां
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
मम प्राण लोचनीं उरला
मी तरी पाहिला त्याला
मम प्राण लोचनीं उरला
मी तरी पाहिला त्याला
तो गगनपथानें गेला
तो गगनपथानें गेला
लाडकी तुझी सम्राज्ञी लाडकी तुझी सम्राज्ञी
आक्रंदत होती जातां
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
अडवितां खलासी पडलों पळविली रावणें सीता
Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now