Sasa Upajala Kasa

सुधीर फडके

बसा मुलांनो बसा बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा बसा मुलांनो बसा आई होती एक तियेचा एक लाडका लेक त्याने केली प्रीत आगळी जगाहुनी विपरीत कुणा मुलीचा ध्यास लागला त्याला रात्रंदिसा बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा त्या मुलगीचा बोल तयाला पृथ्वीहून अनमोल तिने इच्छिले काय मुलाने जिती चिरवी माय आणि तियेचे काळिज आणून तिचा भरावा पसा बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा आई म्हणाली बाळ सखीचा शब्द आपुल्या पाळ तुला लाभते प्रीत तियेस्तव मरेन मी निश्चित कट्यार घे अन्‌ चीर सुखाने उरोभाग तू कसा बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा काळिज असले थोर तयाला कापून घेई पोर लेकासाठी माय सुखाने जिवंत मरुनी जाय देवलोकी ते गेले काळिज सांडित वत्सल रसा बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा देव म्हणाला यास धाडणे भाग नव्या जन्मास औक्ष राहिले अजून तरी हे आले आपणहून ते आईचे काळिज घेऊन देवे घडला ससा बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा हृदयासम कोवळा सजीव हा आईचा कळवळा आवडती या मुले गोजिरी देवाघरची फुले स्पर्शच याचा बघा आईच्या हातासम गोडसा बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा सांगतो कसा उपजला ससा

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs