Dole Majhe Tyat Tujhe
सुधीर फडके, सुमन कल्याणपुर
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
चित्त माझे त्यात तुझी प्रीत कशी
वीज इथे आग तिथे सांग कशी
नीज माझी त्यात तुझे स्वप्न कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
गाल माझे त्यात तुझे रंग कसा
स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा
गाल माझे त्यात तुझे रंग कसा
स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा
गाल माझे त्यात तुझे रंग कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
चंद्र माझा त्यात तुझा डाग कसा
देह इथे प्राण तिथे सांग कसा
चाल माझी त्यात तुझे सूर कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
श्वास माझा त्यात तुझी ओढ कशी
चोर तिथे चोरी इथे सांग कशी
श्वास माझा त्यात तुझी ओढ कशी
चोर तिथे चोरी इथे सांग कशी
वेध माझा त्यात तुझे तीर कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
Written by: Madhusudan Kalelkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now