Majhya Re Preeti Phoola
सुधीर फडके, Asha Bhosale
माझ्या रे प्रीती फुला
ठेवू मी कोठे तुला आ
माझ्या रे माझ्या प्रीती फुला माझ्या
मिरवू माथी
का तुला मी दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य माझे
उघड सार्या निंदका
काळजाचा कंद तू रे
रंग डोळ्यांतला
माझ्या रे प्रीती फुला माझ्या
अधीर हळवे दोन डोळे
पुष्पपात्रे ही निळी
ठेविसी तेथे फुला तू
फुलत जाते पाकळी
भोवताली गंध दाटे धुंद चैत्रातला
माझ्या रे प्रीती फुला माझ्या
तूच नयनी तूच हृदयी
तूच वसशी जीवनी
काळ जाई कळत नाही
दिवस किंवा यामिनी
आणला गे काय संगे
गंध स्वर्गातला
माझ्या रे प्रीती फुला
ठेवू मी कोठे तुला आ माझ्या रे
माझ्या प्रीती फुला माझ्या
Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now