Aakashi Zep Ghere Pakhara

सुधीर फडके

आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने दरी डोंगर हिरवी राने दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा

Written by: JAGDISH KHEBUDKAR, SUDHIR V PHADKELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs