Sharad Sundeer Chanderi Rati

संगीत कुलकर्णी, शुभांगी जोशी

शारद सुंदर चंदेरी राती ला ला ला ला ला शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगेसोयरे मी सांडिले पाठी तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगेसोयरे मी सांडिले पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती प्रीतिची हीच न रीती? कशाला कुणाची भीती? झाडामागे चांद हा वरती आला ये ना, ये ना आतुर जीव हा झाला मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला वाऱ्यात लहर मंद फुलांचा मादक गंध मोगरा चमेली कुंद जिवाला करिती धुंद माझ्या देही पुनवचांदणे साजे प्राणांमध्ये प्रीतिची पावरी वाजे आज राया, धुंद काया, मोहवाया शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगेसोयरे मी सांडिले पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला ला लाssss

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs