Kode Sope Thode
Shruti Athavale
कोडे सोपे थोडे अवघड थोडे पडले का रे
जागे होण्याआधी स्वप्न नव्याने घडले का रे
सारी रात ही मोहरून गेली धुक्याने
अन पहाटेच्या दवाला गंध आला का तुझा
कोडे सोपे थोडे अवघड थोडे पडले का रे
जागे होण्याआधी स्वप्न नव्याने घडले का रे
हे तुझ्यासवे तुझ्यातले क्षण माझे
ये तुझ्यातुनी तुझ्याकडे मन माझे
हे अनोळखी अजाणते जग होते
ये क्षणोक्षणी सुखवूनी बघ नाते
ओढून या नेती मला आत का लाटा
हाताशी लागलेला हा मोत्याचा शिंपला
कोडे सोपे थोडे अवघड थोडे पडले का रे
जागे होण्याआधी स्वप्न नव्याने घडले का रे
ओ ओ ओ ओ सो शे
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now