Yuge Attavis Vithalachi Aarti
महेश हिरेमठ
युगे अठ्ठावीस विठोबा विटेवरी उभा
वामांगी रखुमाई विठोबा दिसे विठोबा दिव्य शोभा
पुण्डलिकाचे भेटि विठोबा परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा विठोबा उद्धरी जगा
जय देवा जय देवा विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा विठोबा
राईच्या वल्लभा विठोबा पावे जिवलगा
तुळसीमाळा गळा विठोबा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर विठोबा कस्तुरी लल्लाटी
देव सुरवरविठोबा नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त विठोबा पुढे उभे राहती
जय देवा जय देवा विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा विठोबा
राईच्या वल्लभा विठोबा पावे जिवलगा
धन्य वेणूनाद विठोबा अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे विठोबा वनमाळा गळा
राई रखुमाबाई विठोबा राणीया सकळा
ओवाळिती राजाविठोबा विठोबा सावळा
जय देवा जय देवा विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा विठोबा
राईच्या वल्लभा विठोबा पावे जिवलगा
ओवाळू आरत्या विठोबा कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी विठोबा सोडुनिया देती
दिण्ड्या पताकाविठोबा वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा विठोबा वर्णावा किती
जय देवा जय देवा विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा विठोबा
राईच्या वल्लभा विठोबा पावे जिवलगा
आषाढी कार्तिकी विठोबा भक्तजन येती
चन्द्रभागेमध्ये विठोबा स्नाने जे करिती
दर्शन हेळामात्रे विठोबा तया होय मुक्ति
केशवासी नामदेव विठोबा भावे ओवाळिती
जय देवा जय देवा विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा विठोबा
राईच्या वल्लभा विठोबा पावे जिवलगा
जय देवा जय देवा विठोबा जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा विठोबा
राईच्या वल्लभा विठोबा पावे जिवलगा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now