Firtya Chakavarti Desi Matila

महेश हिरेमथ, महेश हिरेमठ

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार तूच घडविशी तूच तोडीसी कुरवाळीशी तू तूच ताडिसी तूच घडविशी तूच तोडीसी कुरवाळीशी तू तूच ताडिसी न कळे यातून काय जोडीशी देसी डोळे परी निर्मिसी तयांपुढे अंधार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs