He Chincheche Zaad

महेंद्र कपूर

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे प्रीतीमुळे उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालिती शिरी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी हे चिंचेचे झाड रुसलीस उगा का जवळी येना जरा गा गीत बुल्बुला माझ्या चित्तपाखरा हा राग खरा की नखर्‍याचा मोह्रा मोह्रा कितीवार मी मरू तुझ्यावर किंती करू शाहिरी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी हे चिंचेचे झाड हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके तुज दाल सरोवर दिसते का लाडके पाण्यात तरंगे घरकुलसे होडके त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी हे चिंचेचे झाड

Written by: G D Madgulkar, N Dutta, N. DUTTA, UMAKANT KANEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs