Disashi Too Navtaruni Kashmiri
महेंद्र कपूर
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड
बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे ग पिवळे केशर मळे
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी
दिसशी तू दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड
रुसलीस उगा का जवळी ये ना जरा
गा गीत बुलबुला माझ्या चितपाखरा
हा राग खरा की नखर्याचा मोहरा मोहरा
किती वार मी मरू तुझ्यावर, किती करू शाहिरी
दिसशी तू दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड
हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी
दिसशी तू दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड
Written by: G D Madgulkar, N DuttaLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now