Ek Don Teen
सी रामचंद्र, महेंद्र कपूर
एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन
माणुसकीचे पाईक आम्ही असे वारसा हा प्राचीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन
सज्जन त्यांचे आम्ही साथी ब्रीद सांगते निधडी छाती
त्यांच्यासाठी धावुन जाऊ मरणहि माथा झेलून घेऊ
भला तयाला धरू उराशी उच्च असो वा अनाथ दीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन
माणुसकीचे केवळ लांछन दुर्जन तो तो अमुचा दुष्मन
निर्भयतेने गर्जत हर हर संगर त्याशी करू भयंकर
दुष्ट तयाचे दमन करावे मार्ग नसे हा अम्हा नवीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन
एक जाणतो आम्ही प्रीती तोच वेद ती गाथा पोथी
मंगल पावन प्रीतीसाठी विष हो अमृत अमुच्या ओठी
या प्रीतीच्या चरणांवरती विश्व होतसे अवघे लीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन एक दोन तीन
Written by: N Dutta, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now