Anjanichya Soota
महेंद्र कपूर
हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अन एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
अरे हादरली ही धरणी थरथरले आसमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
हे द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
हे तळहातावर आला घेउनी पंचप्राण
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका डंका रे डंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
अरे उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
अरे हादरली ही धरणी थरथरले आसमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
अरे घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे राम लक्षुमण जानकी जय बोलो हनुमानकी
हे राम लक्षुमण जानकी जय बोलो हनुमानकी
हे राम लक्षुमण जानकी जय बोलो हनुमानकी
हे राम हे राम हे राम
बोला राम भक्त हनुमानकी जय
Written by: Dada Kondke, Ram LaxmanLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now