Nahi Yethe Kuni Kunacha

Asha Bhosale

नाही येथे कुणी कुणाचा नाही येथे कुणी कुणाचा स्वार्थ हा एकच न्याय जगाचा नाही येथे कुणी कुणाचा नाही येथे कुणी कुणाचा कुणी न इथला नित्‌ रहिवासी जो जो आला जाणे त्यासी स्वार्थ सुटेना परि तयासी स्वार्थास्तव कुणि इमान विकती कोणी विकती वाचा स्वार्थ हा एकच न्याय जगाचा नाही येथे कुणी कुणाचा नाही येथे कुणी कुणाचा बळी कुणी स्वार्थाचे होती जिवंत तेही मरण भोगती भुतासारखे जगी वागती शाप बाधतो परि तयांना तळमळत्या आत्म्याचा स्वार्थ हा एकच न्याय जगाचा नाही येथे कुणी कुणाचा नाही येथे कुणी कुणाचा सावध सावध सोडव विळखा दूर सारुनी फसवा बुरखा पारखून घे अपुला परका मायावी मयसभा असे ही रंगमंच कपटाचा स्वार्थ हा एकच न्याय जगाचा नाही येथे कुणी कुणाचा नाही येथे कुणी कुणाचा

Written by: N Dutta, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs