Mi Giridhar Var Varila

Asha Bhosale

हाय बय्या अर्ध्या रात्री यमुना पात्री कर त्याने धरिला गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला रंगरंग नीत मजसी खेळतो रंगनाथ माझा मी मेवाडी राजदुलारी मथुरेचा तो राजा जगावेगळी माझी सत्ता ध्यास न दुसरा उरला गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला फेर धरून मी नाच नाचले न्याहळते शामा मीच राधिका मीच रुक्मिणी मीच तयाची भामा मुखी नाचते नाम तयाचे ताल पैंजणी उरला गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला कालिंदीच्या तटी कलयुगी रोज रंगते होरी रोज रंगते होरी भिजे ओढणी भिजे कंचुकी भिजती अंगी सारी आनंदाचा पडतो पाऊस आनंदाचा पडतो पाऊस मेघ सावळा सरला गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला

Written by: G D MADGULKAR, PRABHAKAR JOGLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs