Galyat Majhya Tuch Jivalaga

Asha Bhosale

गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले गळ्यात माझ्या तूच जिवलगा दिसायला मी काळी सावळी मुलखाची लाजरी नटणे सजणे या भोळीला ठाऊक नसता परी तव नयनांचा तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी वठल्या देही चैत्रपालवी कणकण मोहरले गळ्यात माझ्या तूच जिवलगा प्रीतीची तव खातर होऊन तुझ्याकडे धावले जनरुढीच्या लोहशृंखला झाली जड पाउले कुचाळकीची कुचाळकीची आग पसरुनी उठता ही वादळे हात देउनी तूच राजसा फुलापरी झेलले गळ्यात माझ्या तूच जिवलगा पाचूचा हा चुडा भरुनिया तुजभवती नाचले आनंदाचे अश्रू उधळित सप्तपदी चालले तूच दयाळा तूच दयाळा सौभाग्याचे लेणे मज अर्पिले अभागीनीच्या कुंकू कपाळी सख्या तुवा लाविले गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले

Written by: P Savlaram, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs