Ha Chandra Tujhyasathi

स्वप्निल बांदोडकर

हा चंद्र तुझ्यासाठी ही रात तुझ्यासाठी आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी हा चंद्र तुझ्यासाठी ही रात तुझ्यासाठी आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी कैफात अशावेळी मज याद तुझी आली ये ना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु अनुरागी रसरंगी होऊन ये तु नाजुकशी एक परी होऊन ये तु वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे रेशिम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरु दे नाव तुझे माझ्या ओठावर येते फुल जसे की फुलताना दरवळते इतके मज कळते अधुरा मी येथे चांद रात ही बघ निसटुन जाते बांधिन गगनास झुला जर देशील साथ मला ये ना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु अनुरागी रसरंगी होऊन ये तु नाजुकशी एक परी होऊन ये तु हे क्षण हळवे एकांताचे दाटलेले माझ्या किती भोवताली चाहुल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली आज तुला सारे काही सांगावे बिलगुनिया तु मजला ते ऐकावे होऊन कारंजे उसळे मन माझे पाऊल का अजुनही न तुझे वाजे जीव माझा व्याकुळला दे आता हाक मला ये ना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु ये ना थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु ये ना अनुरागी रसरंगी होऊन ये तु ये ना नाजुकशी एक परी होऊन ये तु

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs