Ye Aboli Laaj Daahi

अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर

ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा मी दिले काही तुला ग मीही राजा घेतले ये कळी पहिली सुखाला गुपित सांगे आतले स्वप्न अधरी स्वप्न पदरी भाव रूजला कोवळा ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा पाकळीच्या पावलांच्या गंधगहिऱ्या चाहुली स्वप्न ये हातात माझ्या होउनीया बाहुली बाहुलीला जोजवीता गीत येते या गळा ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा जे हवे ते सर्व लाभे काय मागू मी दुजे चित्र भावी जीवनाचे बिंब हे माझेतुझे लागला साऱ्या घराला हा असा याचा लळा ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा

Written by: Ashok Patki, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs