Mee Marathi
वैशाली सामंत, उद्देश नंदेश, वैशाली सावंत, आरती अंकलीकर, सुरेश वाडकर, साधना सरगम, अवधुद गुप्ते, कविता कृष्णमूर्ति, रविंद्र साठे
उत्तुंग भरारी घेऊ या
उत्तुंग भरारी घेऊ या
उत्तुंग भरारी घेऊ या
उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मराठी मी मराठी
शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषीमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शाचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोर्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मराठी मी मराठी
मराठी मी मराठी
गणाधीश नाचतो रंगुनी
गणाधीश नाचतो रंगुनी
नवरात्रीची अंबा भवानी
नवरात्रीची अंबा भवानी
गणाधीश नाचतो रंगुनी
यळकोटाचा भंडार उधळी
खंडोबाची आण घेउनी
यळकोटाचा भंडार उधळी
खंडोबाची आण घेउनी
वारकऱ्यांची सुरेल दिंडी
विठुरायाचे नाम गर्जते
समृद्धीची पावनगंगा भरून येथे नित्य वाहते
मनगटात यश आहे अमुच्या आणि कीर्ति ललाटी
मनगटात यश आहे अमुच्या आणि कीर्ति ललाटी
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मराठी मी मराठी
अभंग ओवी फटका गवळण धुंद पवाडा धुंद लावणी
माय मराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ज्ञान कला भक्ती विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते
जिंकू आम्ही आव्हानांना देऊन आव्हाने मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मराठी मी मराठी
घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशीही झुंज देउनी सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा अमुच्या जिवास जीवही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ
साधे भोळी दिसतो परि गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मराठी मी मराठी
महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सळळांसाठी अंकुरते अंगाई
महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सळळांसाठी अंकुरते अंगाई
संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिते जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी
दरिखोऱयातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मी मराठी मी मराठी
मराठी मी मराठी
Written by: AVADHOOT GUPTE, CHANDRSHEKHR SANEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now