Tujhe Geet Ganyasathi

सुधीर फडके

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउं दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे तुझे गीत गाण्यासाठी शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी या सुंदर यात्रेसाठी मला जाउं दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे तुझे गीत गाण्यासाठी मोर केशराचे झुलती पहाटेस दारी मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी वाजती सतारी सोहळयात सौंदर्याच्या सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे तुझे गीत गाण्यासाठी शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेउन येती गंध धुंद वारे गंध धुंद वारे चांदण्यात आनंदाच्या चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे तुझे गीत गाण्यासाठी एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे तुझे गीत गाण्यासाठी

Written by: Mangesh Padgaonkar, Yeshwant DeoLyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store