Rangu Bajarla Jaate
वसंतराव देशपांडे, ललिता फडके
कोल्हापुरेचे माझे एक मित्र याहू जोशी
आणि मी असा दोघांनी मिळून एक चित्रपट तयार केला
वंशाचा दिवा आणि लोकांनी त्याच अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत केलं
त्या चित्रपटामध्ये ललिता आणि
प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे
या दोघांनी मिळून एक डुएट याला युगल गीत म्हणतात
असं गायलं होत परंतु
एक प्रत्यक्ष घडलेली घटना अशी आहे
सातारा जिल्ह्या मध्ये एका खेडेगावांमध्ये
पाणी भरायला अशा विहिरीवरती काही बायका जमलेल्या होत्या
आणि तिथून एक माणूस फेटेवाला
कोणीतरी असेल गुलहौशी
असा हे गाणं म्हणत म्हणत चालला होता
रंगू बाजारला जाते हे जाऊ द्या
दही इकाया नेते हे नेऊ द्या
आणि त्याचे पुढचे शब्द असे काही होते कि ते गाणं म्हणत म्हणत चाललेला
तो कुठल्या हि उद्देशाने म्हणत चाललेला नसेल
पण त्या ऐकणाऱ्या गाणं ऐकणाऱ्या आणि
पाणी भरणाऱ्या त्या बायकांना ते गाणं ऐकून इतका संताप आला
कि ते बहुतेक आपल्यालाच उद्देशून हा गाणं म्हणतोय
आणि त्या ज्या चिडल्या
आणि इतका अघटित अस काही घडलं कि
त्या बायकांच्या घरच्या लोकांनी एकत्र जमून
त्याचा खून केला आपल्या बायकांची छेड काढतो म्हणून
असा इतिहास त्या गाण्याला आहे
आता हे कोणाला खर तरी वाटेल का सांगा
रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
दही इकाया नेते हो नेऊ द्या
ओ दही इकाया नेते हो नेऊ द्या
रंगू बाजारला जाते रंगू बाजारला जाते
रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
रंगू डुलत डुलत चालते
गोर्या नाकात नथनी हालते
हाक मारावी एकदा वाटते वाटते वाटते
राहु द्या
बाजारला जाते हो जाऊ द्या
ओ दही इकाया नेते हो नेऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
जरा थांबून बोल ग रंगू
माझ्या मनातलं कसं ग सांगू
जरा थांबून बोल ग रंगू
माझ्या मनातलं कसं ग सांगू
तुला पाहून काळीज तुटते तुटते तुटते
तुटु द्या
बाजारला जाते हो जाऊ द्या
दही इकाया नेते हो नेऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
रंगू वळख आहे मी कोण
रंगू वळख आहे मी कोण
माझ्या पायातला पैंजण
मी पायातलं पायात ठेवते ठेवते ठेवते
ठेवु द्या
बाजारला जाते हो जाऊ द्या
दही इकाया नेते हो नेऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
तुझा पाठलाग रंगू करीन
तुझा पाठलाग रंगू करीन
अशी मुरडून कान मी धरीन
तुझं कानशील थोडं शेकते शेकते शेकते
चालु द्या
बाजारला जाते हो जाऊ द्या
दही इकाया नेते हो नेऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
केली थट्टा अंगाशी आली
तरी आम्ही सांगत होतो हो
केली थट्टा अंगाशी आली
लाज रंगूची माझ्या गाली
माझं काय होणार
रंगू मर्दानी थाटात चालते चालते चालते
चालू द्या
बाजारला जाते हो जाऊ द्या
दही इकाया नेते हो नेऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
रंगू बाजारला जाते रंगू बाजारला जाते
रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
ओ रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now