Dolyat Vakun Baghtos
उषा मंगेशकर
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
सोडून बसलास नजरंचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ
सोडून बसलास नजरंचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ
कसंबी झोक
गळाचं टोक
कसंबी झोक तुझ्या
गळाचं टोक
जिव्हारी माझ्या भिडायचं नाय नाय नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
रुपेरी पोट माझं रुपेरी कल्लं
रुपेरी पोट माझं रुपेरी कल्लं
रुपेरी शेपटीचं मारीन वल्हं
निळीनिळी लाट
पाण्यातली वाट
निळीनिळी लाट माझी
पाण्यातली वाट
माझ्याबिगर तुला ठावीच नाय नाय नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यात मासोळी गावायची नाय
जाळ्यात मासोळी गावायची नाय
सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळा देईन मी दडी
सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळा देईन मी दडी
कुठवर बसशिल
चेटूक करशिल
कुठवर बसशिल
चेटूक करशिल
मंतर असला चालायचा नाय नाय नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यात मासोळी गावायची नाय
जाळ्यात मासोळी गावायची नाय नाय नाय
Written by: BHASKAR CHANDAVARKAR, SHANTA SHELKELyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now