Ughadle Ek Chandani Daar

सुमन कल्याणपुर

उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार उजेड दिसतो आत केशरी उजेड दिसतो आत केशरी सोन्याचा संसार उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार मांडवात मी सहज चालले मांडवात मी सहज चालले धन्यासंगती सात पाऊले धन्यासंगती सात पाऊले येता येता कुठे पोचले घर कसले हे धरणीवरती स्वर्गाचा अवतार उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार वस्तू वस्तू इथे देखणी वस्तू वस्तू इथे देखणी दौलत भरते सदैव पाणी दौलत भरते सदैव पाणी या घरची मी झाले राणी कुण्या जन्मीच्या पुण्याईने आला हा अधिकार उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार नवस करुनिया कुठल्या देवा नवस करुनिया कुठल्या देवा असा सुखाचा लाभे ठेवा असा सुखाचा लाभे ठेवा वडिल माऊली यांना ठावा सुखातही या येतो आठव त्यांचा वारंवार उघडले एक चंदनी दार उघडले एक चंदनी दार

Written by: G D Madgulkar, Vasant PawarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs