Shree Gurunchi Aarti
श्रीदर फडके, रंजना जोगळेकर
सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता
कलिमल दहना गहना स्वामी समर्था
न कळे ब्रह्मादिकां अंत अनंता
तो तू आम्हां सुलभ जय कृपावंता
जयदेव जयदेव
जयदेव जयदेव जय करुणाकरा
आरती ओवाळू सदगुरू माहेरा
जयदेव जयदेव
माये वीण माहेर विश्रांती ठाव
शब्दी अर्थी हाव बोलणे भाव
सदगुरूप्रसादे सुगम उपाव
रामी रामदासा घडला सदभाव
जयदेव जयदेव
जयदेव जयदेव जय करुणाकरा
आरती ओवाळू सदगुरू माहेरा
जयदेव जयदेव
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेती नेती शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अन्त
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव
दत्त येऊनियां ऊभा ठाकला
साष्टांग नमन प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपलें मन झालें उन्मन
मी तू पणाची झाली ओसन
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता
जय देव जय देव
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now