Jagnyache Bhaan
शंकर महादेवन
स्पर्शाच्या धूसर रेषा मौनाची मोहक भाषा
प्रश्नांना पडले उत्तर काहूर व्हावे अंतर
रस्ता हा आहे बोलका
सावल्या मनाच्या वेड्या जाऊदेत बिलगून थोड्या
रुणझुणतील सावरण्याची सात पावले
जगण्याचे भान हे नाते आपुले
अवघी तहान ही नाते आपुले
जगण्याचे भान हे नाते आपुले
अवघी तहान ही नाते आपुले
ह्म्म्म सर तू उन्हाची झालो मी सावळा
लागून ये ग पावसाच्या झळा
हं सर तू उन्हाची झालो मी सावळा
लागून ये ग पावसाच्या झळा
हाही दुरावा केवढा कोवळा
या सोबतीचा लागला हा लळा
विसरून जा ना जरलेले सारे
आतूर दोन्ही झाले किनारे
स्पर्शाविना ही सारे सांगून गेले
हो जगण्याचे भान हे नाते आपुले
अवघी तहान ही नाते आपुले
जगण्याचे भान हे नाते आपुले
अवघी तहान ही नाते आपुले
सावळा रंग हा होत असे ह्या मनाचा
सावळा रंग हा होत असे ह्या मनाचा
का नजर लागते काजळी रातीला
आपुल्याचे पाउल वाटा एक होत जातील आता
गुण गुंतील आपल्याला सांगे आज पाखरे
जगण्याचे भान हे नाते आपुले
अवघी तहान ही नाते आपुले
जगण्याचे भान हे नाते आपुले (जगण्याचे)
अवघी तहान ही नाते आपुले (हे हे आपुले )
हो जगण्याचे भान हे नाते आपुले(जगण्याचे)
अवघी तहान ही नाते आपुले (हे हे आपुले )
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now