Ghanshyam Nayani Ala
सरस्वती राणे
घनश्याम नयनीं आला घनश्याम नयनीं आला
सखे मी काजळ घालू कशाला आ आ काजळ घालू कशाला
रोमांचांनी नटली काया रोमांचांनी नटली काया
हिरे माणके कशास वाया हिरे माणके कशास वाया
कशास मोहनमाला कशास मोहनमाला सखे मी काजळ घालू कशाला
घनश्याम नयनीं आला घनश्याम नयनीं आला
सखे मी काजळ घालू कशाला आ आ काजळ घालू कशाला
कटीभोवती कर कृष्णाचे कटीभोवती कर कृष्णाचे
लेणे ल्याले आभासाचे लेणे ल्याले आभासाचे
कशास मग मेखला कशास मग मेखला आ आ
कशास मग मेखला सखे मी काजळ घालू कशाला
घनश्याम नयनीं आला घनश्याम नयनीं आला
सखे मी काजळ घालू कशाला आ आ काजळ घालू कशाला
कृष्णसख्याची मादक मुरली कृष्णसख्याची मादक मुरली
रात्रंदिन या कानी भरली रात्रंदिन या कानी भरली
रात्रंदिन या कानी भरली आ आ आ आ
शृंगार सर्व झाला शृंगार सर्व झाला सखे मी काजळ घालू कशाला
घनश्याम नयनीं आला घनश्याम नयनीं आला घनश्याम नयनीं आला
सखे मी काजळ घालू कशाला आ आ काजळ घालू कशाला
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now