Ananta Tula Kase Re Stavave

त्यागराज खाडिलकर, वर्षा भावे, माधुरी, प्रभंजन मराठे, मेघा गोगटे, अनुप जलोटा, मंगला काणे, शेखर कुंभोजकर

अनंता तुला ते कसे रे स्तवावे अनंता तुला ते कसे रे नमावे अनंत मुखांचा शिणे शेष गाथा नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे तरावे जगा तारुनी मायताता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा वसे जो सदा दावया संत लीला दिसे अज्ञ लोकापरी जो जनाला परी अंतरि ज्ञान कैवल्यदाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा बरा लाधला जन्म हां मानवाचा नरा सार्थका साधनीभुत साचा धरु साईप्रेमा गळाया अहंता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा धरावे करी सान अल्पज्ञ बाला करावे आम्हा धन्य चुंबोनि घाला मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताति सुरादिक ज्यांचे समानत्व देती प्रयगादि तीर्थेपदि नम्र होता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली सदा रंगली चित्स्वरुपि मिळाली करी रासक्रीड़ा सवे कृष्णनाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुला मागतो मागणे एक द्यावे करा जोडितो दिन अत्यंत भावे भवि मोहनीराज हा तारी आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs