Mee Bheek Maagnaari

Asha Bhosle

मी भीक मागणारी दातार तू उदार झोळीत टाकलासी का शेवटी नकार मी भीक मागणारी मज आस आसऱ्याची आश्वासिलेस तु ही होकार तोच आता गर्जे कठोर नाही कुरवाळुनी कशाला केलास हा प्रहार झोळीत टाकलासी का शेवटी नकार मी भीक मागणारी राजीव लोचनांच्या मी पिंजऱ्यात होते डोळ्यांत भाव भोळा ओठांत गोड गीते पाळीव पाखराची केलीस का शिकार झोळीत टाकलासी का शेवटी नकार मी भीक मागणारी आता कुठे फिरू मी पंखात जोम नाही सारे दिले तुला मी मज राहिले न काही एका तुझ्याविना हे जग पेटले शिवार झोळीत टाकलासी का शेवटी नकार मी भीक मागणारी

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store