Tinhi Sanjela Prabhu Charnashi

अनुराधा पौडवाल

तिन्हिसांजेला प्रभुचरणाशी एक नित्य प्रार्थना तिन्हिसांजेला प्रभुचरणाशी एक नित्य प्रार्थना तिमिर जळू दे ज्योत उजळु दे तिमिर जळू दे ज्योत उजळु दे हीच मनोकामना हीच मनोकामना तिन्हिसांजेला प्रभुचरणाशी एक नित्य प्रार्थना ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी सौभाग्याचे अभंग लेणे सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा जपु या कुंकुंमखुणा तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना वत्‍सलतेचा गहिवर जेथे स्पर्श प्रभूचा तेथे ‍होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते तोच फुलांना जागविणारा तोच फुलांना जागविणारा विश्वाची प्रेरणा विश्वाची प्रेरणा तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते ठायी ठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते जन्‍म होऊ द्या नृत्य हरीचे जन्‍म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना मंगलमय चेतना तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना तिमिर जळू दे ज्योत उजळु दे तिमिर जळू दे ज्योत उजळु दे हीच मनोकामना हीच मनोकामना तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs