Chandana Tipur Halto Wara

जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर

चांदणं टिपूर चांदणं टिपूर हलतो वारा की डुलतो वारा टाकते पलंग टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा चांदणं टिपूर चांदणं टिपूर हलतो वारा की डुलतो वारा डावी पापणी फुरफुर करी नवसाला अंबाबाई पावली खरी हो डावी पापणी फुरफुर करी नवसाला अंबाबाई पावली खरी अवचित सजणा आला घरी मनिच्या खुशीत की मजला कुशीत घ्या दिलदारा हुर्रर्रर्रर्र आहा पंचकल्याणी घोड्यावरून दौडत आलो सये दुरुन बघ ना पंचकल्याणी घोड्यावरून दौडत आलो सये दुरुन रूप घेऊ दे डोळा भरून रूप घेऊ दे डोळा भरून तुजला बघून ग जाइल निघून हा थकवा सारा चांदणं टिपूर हलतो वारा की डुलतो वारा चांदणं टिपूर हलतो वारा की डुलतो वारा शालूच्या पदरानं पुसते हा पाय खायाला देते मी साखरसाय हो शालूच्या पदरानं पुसते हा पाय खायाला देते मी साखरसाय आणखीन सेवा करू मी काय पडते गळा की लावते लळा की द्या आधारा चांदणं टिपूर हलतो वारा की डुलतो वारा चांदणं टिपूर हलतो वारा की डुलतो वारा

Written by: BHASKAR CHANDAVARKAR, SHANTA SHELKELyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs