Tumchya Sang Mala Yeu Dha
महेंद्र कपूर
आरं थांबा किरं
तुमच्या संग मला येउद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
तुमच्या संग मला येउद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
मला सोडून जाताय खरं
नाही व्हणार तुमच बरं
घरी कोंडून ठेवताय पोरं
बंद होणार देवाची दारं
अरं दिंड्या न वारकरी पाहुद्या
अरं दिंड्या न वारकरी पाहुद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
तुमच्या संग मला येउद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि हा
हे हाय का तुम्हाला ठावं
गोर गरिबाला संगती न्हावं
जो दावतोय दुजाभावं
त्याला कसा हो पावणार देवं
अरं तीर्थ प्रसाद मला खाऊद्या
अरं तीर्थ प्रसाद मला खाऊद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
तुमच्या संग मला येउद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि हा
नाही बोलणार वाईट कुणा
माफ कराव एवढा गुन्हा
नका दुखवू माझ्या मना
हात जोडूनी सांगतोय पुन्हा
अरं कपाळी भंडारा लाऊद्या
अरं कपाळी भंडारा लाऊद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
अरे तुमच्या संग मला येउद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
आता शेवटच सांगतोय ऐका
नको मला सोन नान पैका
ज्याला थोडीशी जाणीव हाय का
असा तुमच्यामंधी कोणी नाय का
चंद्र भागेच पाणी पिऊ द्या
चंद्र भागेच पाणी पिऊ द्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
तुमच्या संग मला येउद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
कपाळी भंडारा लाऊद्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
राम नामाचा गजर गाऊ द्या किरं
देवाचं दर्शन घेऊ द्या कि
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now